भारतीयांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देणे, ब्रिटिश राजवटीविरोधात जनजागृती करणे आणि लोकप्रबोधनातून समाजाला संघटित करणे यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केले. १८९३ च्या सुमारास सुरू झालेल्या या उत्सवाने स्वातंत्र्यसंग्रामात मोठी भूमिका बजावली. क्रांतिकारकांना गुप्तपणे शस्त्रास्त्रे पुरवणे, त्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, स्वातंत्र्यलढ्यासाठी निधी उभारणे आणि भेद मोडून समाज एकसंध करणे, अशा अनेक मार्गांनी गणेशोत्सव मंडळे राष्ट्रकार्यात उतरली. स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या या दैदिप्यमान राष्ट्रकार्याचा आढावा घेऊया..