संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्हेहून हैबतराव बाबांची जन्मभूमी असलेल्या साताऱ्यातील लोणंदसाठी मार्गस्थ झाली. परंपरेप्रमाणे नीरा नदीकाठी विसावा घेतल्यानंतर दत्त घाटावर माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. वारकरी देखील नीरा स्नान करून अंतःकरणाच्या शुद्धतेने चिंब झाले. नीरा नदीच्या पवित्र प्रवाहात स्नान केल्यावर मनातील सर्व विकार नदी प्रवाहातून वाहून जातात, आत्मिक शुद्धता लाभते, अशी श्रद्धा आहे.