गोव्यातील तिलारी परिसरातून शेकडो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. गोव्यातून पंढरपूरकडे निघणाऱ्या वारीची शतकानुशतकांची परंपरा यंदाही अखंडपणे सुरू राहिली.टाळ-मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या अखंड गजरात आणि भगव्या पताका फडकवत भक्तिमय वातावरणात वारीला प्रारंभ झाला. भजन किर्तनात दंग झालेल्या वारक-यांचा उत्साह ओसंडून वाहत होता …