HinduismNews

अवघा रंग एक झाला.. भाग १०

“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

पांडुरंगाचे अनन्य भक्त संत गोरोबा कुंभार..

वारकरी संप्रदायात अनेक संतांनी आपल्या निराकार भक्तीने समाजमनाचा वेध घेतला. या संतपरंपरेत निस्पृहता, समता आणि कर्मयोगाचा आदर्श घालून देणारे संत म्हणजे संत गोरा कुंभार.माउलींच्या,संत नामदेवांच्या समकालीन असलेल्या गोरोबांनी आपल्या कुंभारकामाच्या व्यवसायातूनच परमार्थाचा आदर्श आपल्यासमोर ठेवला.

अंतरीचे गुज बोलेल जो कोणी। तयांच्या चरणी देव राहे ॥
नाही भेद काही विठ्ठल नामात । समरस गात संतजन ॥

अर्थात :- विठ्ठलाच्या नामात आणि भक्तीत कोणताही लहान-मोठा किंवा जातीचा भेद नाही. जेव्हा समाजातील सर्व लोक भेद विसरून एकत्र येतात आणि एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस होतात, तिथेच पांडुरंग निवास करतो.

संतांच्या मांदियाळीत ‘मडके परीक्षा’ करण्याचे म्हणजेच कोणाचे ज्ञान किती पक्के आहे हे ठरवण्याचे अधिकार ज्येष्ठत्वामुळे संत गोरा कुंभार यांच्याकडे होते. त्यांनीच नामदेवांचे मडके ‘कच्चे’ असल्याचे सांगितले होते, ज्यातून पुढे नामदेवांना अहंकाराची जाणीव झाली व ते परिपक्व झाले.

आजच्या धावपळीच्या, तणावाच्या जगात संत गोरा कुंभार यांचे जीवन आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. आपले दैनंदिन काम प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे हा भक्तिमय कर्मयोग त्यांनी समाजाला शिकवला.

अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
Back to top button