मनोज मसुरकर, कुटुंब प्रबोधन गतिविधी, कोकण प्रांत संच सदस्य
सुसंस्कारित कुटुंबातून घडते सुदृढ समाजाची पायाभरणी, सज्जनशक्तीच्या संघटनातून निर्माण होते राष्ट्रकार्याचे सामर्थ्य आणि सामाजिक समरसतेतून दृढ होते राष्ट्रीय एकात्मता!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार व्यक्तीमध्ये शिस्त, सेवाभाव, बंधुभाव आणि राष्ट्रनिष्ठा रुजवतात. कुटुंबप्रबोधनातून मूल्यांची जोपासना, सज्जनशक्तीच्या संघटनातून समाजहिताचे कार्य आणि समरसतेतून भेदभावविरहित समाजनिर्मिती साध्य होते. या मूल्यांच्या आधारावर समाजाप्रती कर्तव्यभावना जपणारी, चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी पिढी घडते.